आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुंबई विद्यापीठात छात्रभारतीने फोडली समस्यांची हंडी

मुंबई प्रतिनिधी - जनार्दन येडगे

मुंबई – मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्यांची हंडी छात्रभारतीच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॕम्पस समोर फोडण्यात आली.निकालातील गोंधळ, परीक्षा विभागातील भ्रष्टाचार , फी वाढ, विद्यार्थ्यांची लूट, कॅालेजची मनमानी, हॅास्टेलची गैरसोय, निकृष्ट कॕन्टीन, अश्या अनेक समस्या वर्षानुवर्षे विद्यार्थ्यांना भेडसावत आहे.कुलगुरुंचे विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे अजिबात लक्ष नाही. विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यात त्यांना रस नाही असेच वाटते. परंतु विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्याचा दिशेने प्रशासन कधी काम करेल हे सांगणे खूपच अवघड आहे.

दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर या सर्व अडचणी विद्यापीठ प्रशासनाच्या निदर्शनास आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. झोपेचे सोंग घेतलेले प्रशासन जागे झाल्यास विद्यार्थ्यांच्या अडचणी कमी होतील असे छात्रभारतीचे राज्य अध्यक्ष रोहित ढाले यांनी सांगितले

यावेळी मुंबई अध्यक्ष विकास पटेकर, निकेत वाळके, चेतन पाटील, दिप्ती शेलार, सोहम बांगर, प्रज्वल भालेराव, निधी शुक्ला, प्रिया आरोटे, संजना कांबळे, अनुराधा त्रिपाठी, जिवीता पालकर, विनित कदम, निलेश झेंडे, धनंजय अगरवार सह विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button