महाराष्ट्र

आयएएस अमोल येडगे यांनी पुणे येथील MSCERT चा पदभार स्वीकारला ; संतोष येडगे यांनी भेट घेत दिल्या शुभेच्छा.

पुणे – सनदी अधिकारी २०१४ च्या बॅच चे आयएएस अधिकारी असलेले श्री. अमोल येडगे यांची यवतमाळ जिल्हाधितारी पदावरुन आता पुणे येथील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परीषद महाराष्ट्र, पुणे या ठिकाणी बदली झाली आहे. त्यांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परीषद महाराष्ट्र संचालक पदाचा पदभार स्विकारत कामाला सुरुवात केली. या वेळी सामाजिक कार्यकर्ते तथा खरी लोकजागृती चे संपादक संतोष येडगे यांनी श्री. अमोल येडगे यांची दि.८ सप्टेंबर २०२३ रोजी पुणे येथील कार्यालयात भेट घेतली.

अमोल येडगे हे सण २०१४ चे आयएस अधिकारी आहेत जळगाव येथे प्रशिक्षण केले असून हिंगोली जिह्यातील कळमनुरी येथे उपविभागीय अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्याचप्रमाणे नाशिक उपविभागीय अधिकारी तसेच प्रकल्प अधिकारी, बीड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, तर मुंबई येथे माहिती व तंत्रज्ञान संचालक म्हणून काम केले आहे. डिसेंबर २०२० मध्ये अमरावती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ते रुजू झाले होते. यवतमाळ या ठिकाणी जिल्हाधिकारी पदावर काम केल्यानंतर त्यांची बदली पुण्यात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परीषद या ठिकाणी झाली आहे त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्विकारत कामाला सुरुवात केली यावेळी संतोष येडगे यांनी त्यांच्या पुणे येथील कार्यलयात सदिच्छा भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button