आपला जिल्हा

कोंडगावमध्ये उद्या रंगणार दोन बलाढ्य शाहीरांचा शक्ती तुरा सामना

संगमेश्वर – तालुक्यातील कोंडगावमध्ये उद्या दोन बलाढ्य शाहीरांचा शक्ती तुरा सामना रंगणार आहे.

सद्या श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार असल्याने भजन संध्या फुगड्या तर काही ठिकाणी जाखडी नृत्य आदी कार्यक्रमांची मेजवानीच रसिक जनतेला मिळणार असून कोंडगाव येथील जागरूक व स्वयंभू निदानेश्वर मंदिरात उद्या सोमवारी जाखडीचा जंगी सामना रंगणार आहे

खेड तालुक्यातील चाटव येथील शक्तीवले शाहीर सचिन कदम व लांजा तालुक्यातील केळंबे येथील तुरेवाले शाहीर विशाल -विकास (लांबोरे ) यांच्यात शक्ती तुऱ्याचा महाकाय मुकाबला रंगणार असुन रसिक जनतेला एकप्रकारची मेजवानी मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button