महाराष्ट्र

शिवसेना नेते सुधीर मोरे आत्महत्या प्रकरणी महीलेविरूद्ध गुन्हा दाखल

मुंबई – उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे माजी नगरसेवक व रत्नागिरी य जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर मोरे यांच्या आत्महत्येप्रकरणी एका महिले विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कुर्ला रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये सुधीर मोरे यांच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विक्रोळी पार्क साईड येथे राहणारे शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक, तसेच रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर मोरे (६२) यांचा मृतदेह गुरुवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घाटकोपर विद्याविहार दरम्यान रेल्वे पुलाखाली रेल्वे रुळावर मिळून आला होता. कुर्ला पोलिसांकडून मृतदेह ताब्यात घेऊन अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

दरम्यान शुक्रवारी सुधीर मोरे यांच्या मुलगा समर (२७) याने एका महिलेविरूद्ध कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही महिला विक्रोळीत राहणारी असून एका मोठ्या पदावर असल्याचे चर्चा आहे, सुधीर मोरे यांचे मागील सात-आठ वर्षांपासन तिच्या सोबत मैत्रीपूर्ण संबंध होते. या महिलेचा कॉल आल्यानंतर सुधीर मोरे तणावात ग्रस्त असत अशी माहिती त्यांच्या मुलाने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केलीआहे, ती महिला मोरे यांना धमकी देऊन मानसिक त्रास देत होती असे समर याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. सुधीर मोरे यांच्या मुलाच्या तक्रारीवरून या महिलेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती रेल्वे पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी दिली.

गुरुवारी रात्री सुधीर मोरे रिक्षाने घाटकोपर रेल्वे स्थानकात आले. तेथून रेल्व पादचारी पुलावरून फलाट क्रमांक २ वर आले, तेथून सीएसएमटीच्या दिशेनेरुळावरून चालत उड्डाणपुलापर्यंत आल्याचे घाटकोपर रेल्वे स्थानकावर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात दिसून यत असल्याची माहिती कुर्ला रेल्वे पोलीस यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button