आपला जिल्हा
शिवसेना चिपळूण शहरप्रमुख उमेश सकपाळ यांचा शहर प्रमुख पदाचा राजीनामा ; शिंदे गट शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार

चिपळूण – शहराच्या राजकीय वर्तुळात रविवारी सायंकाळी खळबळ उडाली. उबाठा शिवसेनेचे शहर प्रमुख उमेश सकपाळ यांनी आपल्या संपर्क कार्यालयात शहर कार्यकारिणीतील पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत शहरप्रमुख पदासह पक्षाचा राजीनामा देत आपण शिंदे गटात प्रवेश करीत असल्याचे त्यांनी जाहीर केले. आजवर शिवसेनेसाठी जीवाचे रान केले, कसलीही अपेक्षा न करता पंधरा वर्षे झगडत राहिलो. सातत्याने गळचेपी झाली, तरी काम करीत राहिलो. परंतु आता माझ्या सहकाऱ्यांसाठी, तरुणांसाठी पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या पुढाकारातून काम करायचे आहे, असे सांगत आपण स्वातंत्र्य दिनी शिंदे गटात प्रवेश करीत असल्याचे सांगताना उमेश सकपाळ यांना अश्रू अनावर झाले. भावनाविवश झालेले उमेश सकपाळ यांना बोलणेही अवघड झाले. अश्रू पुसत पुसत ते बैठकीतून निघून गेले.



