
देवरुख – संगमेश्वर तालुका शिवसेना (उबाठा गट), सत्कार सोहळा समिती,रवींद्र माने मित्रमंडळ यांचे वतीने महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, संगमेश्वर लांजा तालुक्याच्या विकासाचे शिल्पकार – शिक्षण, कला व क्रीडा प्रेमी रवींद्र माने हे दि. १७ ऑगस्ट २०२३ रोजी आपल्या वयाची पासष्टी पूर्ण करीत आहेत. ते गेली ४२ वर्षे जनसेवा करीत असून समाजाप्रती असलेल्या योगदानाचे ऋण व्यक्त करण्यासाठी त्यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्यास खासदार विनायक राऊत, चिपळूण-संगमेश्वर शेखर निकम, राजापूरचे आमदार राजन साळवी, गुहागरचे आमदार भास्कर जाधव, माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते, रत्नागिरी जिल्हा मध्य. बँकेचे अध्यक्ष डॉ.तानाजी चोरगे.आजी आमदार सुभाष बने.गणपत कदम. सुरेंद्र(बाळ) माने संजय कदम. सुर्यकांत दळवी. विनय नातू, राष्ट्रवादी काँग्रेस सुरेश उर्फ बारक्याशेठ बने, शिवसेना (उबाठा गट) जिल्हाप्रमुख विलास चाळके , राजेंद्र महाडीक शिवसेना सह संपर्क प्रमुख, सचिन कदम जिल्हाप्रमुख,माजी जि. प. अध्यक्ष रोहन बने,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड. सुरेश भायजे. सौ. वेदा फडके यांची उपस्थिती लाभणार आहे. सदर सोहळा मराठा भवन, देवरुख येथे सायंकाळी संपन्न होत आहे.
तरी या नागरी सत्कार सोहळास बहूसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन निमंत्रक सुधीर मोरे, संपर्क प्रमुख, रत्नागिरी व बबन बांडागळे अध्यक्ष सत्कार समिती व रवींद्र माने मित्रमंडळ,यांनी केले आहे.



