आपला जिल्हा

काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा विभावरी जाधव यांचा सत्कार ; चिपळूण तालुका काँग्रेसच्या संपर्क कार्यालयात कार्यक्रम

चिपळूण - संतोष सावर्डेकर

चिपळूण – रत्नागिरी जिल्हा महिला काँग्रेसच्या नूतन जिल्हाध्यक्ष विभावरी जाधव यांचा आज चिपळूण तालुका काँग्रेसच्या संपर्क कार्यालयात सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक सुरेश राऊत, जिल्हा सरचिटणीस सुरेश कातकर, माजी उपनगराध्यक्ष तथा काँग्रेसचे शहराध्यक्ष लियाकत शाह, माजी नगरसेविका सफा गोठे, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अ. ल. माळी, रत्नागिरी जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्ष अश्विनी भुस्कुटे, चिपळूण तालुका महिला काँग्रेसचे अध्यक्ष निर्मला जाधव, शहराध्यक्ष श्रद्धा कदम, चिपळूण तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष जनार्दन पवार, सचिव शमून घारे, अल्पसंख्याक सेलचे तालुका उपाध्यक्ष रज्जाक मुकादम, ओबीसी विभागाचे प्रदेश सचिव संजय जाधव, संजय उर्फ बंड्या साळवी, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष राकेश दाते, नईम खाटीक, चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव यांचे स्वीय सहायक गुलजार गोलंदाज, रोहन सकपाळ आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button