
महावितरण ची विज बिल भरणेसाठी पतसंस्था व बँकांमधे सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे ग्राहकांना ते सोईचे होत असे.त्यांचा वेळसह सोईच होत अलताना आता महावितरण कंपनीने दिनांक १ ऑगस्ट पासून विज बिल पतसंस्था व बँकांनी बिल कलेक्शन रु ५०००/- पर्यंतच करावे त्यावर असलेली बिल घेवू नयेत अशी बिल ग्राहकांनी त्यावरचे बिल online payment करावे असा आदेश पतसंस्था व बँकांना दिलाआहे. त्यामुळे पतसंस्था व बँकांच्या विज बिल कलेक्शन वर फार मोठा परिणाम होणार आहे. तसेच ग्राहकांना हि त्याचा फटका बसणार आहे त्यामुळे सर्वांवर खूप अन्यायकारक परिणाम होणारआहे. ग्रामीण भागातील विज ग्राहकाला यामुळे मनस्ताप व त्रासदायक होणार असलेने हा आदेश त्वरीत रद्द करावा अशी मागणी पतसंस्थानी केला आहे. याबाबतचे निवेदन आम. शेखर निकम व महावितरणच्या वरिष्ठांना पतसंस्थानी दिले असून हा आदेश रद्द करणेसाठी त्वरित दखल घेवून कार्यवाही करावी अशी ही विनंती वजा मागणी केली आहे.
यावर महाविररण कंपनी काय भुमिका घेत याकडे लक्ष लागले आहे.



