आपला जिल्हा

रत्नागिरी जिल्हा परिषद,सुकिवली गटातून सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र आखाडे निवडणूक लढण्यास इच्छुक!

Lखेड – रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकांचे लवकरच बिगुल वाजणार असुन गटवाईज आरक्षण जाहीर झाले आहे.खेड तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे लक्ष वेधून घेणारा सुकिवली जिल्हा परिषद गट नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव झाला असून विविध राजकीय पक्षांतील ओबीसी कार्यकर्ते निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत.

सुकिवली जिल्हा परिषद गटातील घेरारसाळगड गावचे धनगर समाजाचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र आखाडे हे निवडणूक लढण्यास इच्छुक असुन त्यांचा या गटात जनसंपर्क दांडगा आहे.त्यांनी आजपर्यंत अनेक समाजोपयोगी कामे केली असून गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला आहे.शांत स्वभाव,गोड वाणी व विश्वासाहर्ता या गुणांनी सर्व समाजांमध्ये रामचंद्र आखाडे यांना आदराचे स्थान आहे.प्रशासकीय कामांचा दांडगा अनुभव रामचंद्र आखाडे यांना असुन राजकीय पाठबळ नसतानाही अनेक विकासाची कामे रामचंद्र आखाडे यांनी मार्गी लावली आहेत.आपला माणूस अशी ओळख रामचंद्र आखाडे यांची असून अशा विविध गुणांमुळे अनेक मदतीचे हात रामचंद्र आखाडे यांच्या पाठीशी असून यामुळे सुकिवली जिल्हा परिषद गटातून रामचंद्र आखाडे यांचे पारडे जड आहे.

सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र आखाडे हे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात धनगर समाजासह सर्व ओबीसी व VJNT बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button