आपला जिल्हा

आरवली – येडगेवाडी प्र.जि.मा ४४ वरील गडनदी पूल ठरतोय जीवघेणा ; तातडीने उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी

संगमेश्वर – तालुक्यातील आरवली, मुरडव, कुंभारखाणी, कुचांबे, राजिवली, रातांबी, येडगेवाडी प्र.जि.मा क्र ४४ या मार्गावरील गडनदी धरणाच्या जवळ असलेला कुचांबे कॅालनी येथील गडनदी पूल धोकादायक बनला असून या पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

आरवली ते येडगेवाडी हा एकून ३३ कि.मी चा प्र.जि. मा दर्जाचा रस्ता असून हा रस्ता सध्या अपग्रेड होण्याच्या मार्गावर असून मार्च २०२३ च्या अर्थसंकल्पात या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी ६.५० कोटी रुपये मंजूर केले आहेत. आमदार शेखर निकम यांच्या पुढाकारातून आणि संतोष येडगे यांच्या मागणीनुसार बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी या रस्त्यासाठी ६.५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या मुख्य रस्त्यावरील गडनदी धरणाच्या जवळ असलेला पूल जीवघेणा ठरत असून या पुलासाठी स्थानिक पदाधिकारी तसेच स्थानिक आमदार शेखर निकम आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी लक्ष घालून या पुलाची दुरुस्ती अथवा नविन पुलाचे काम मंजूर करण्यात यावे अशी मागणी स्थानिक जनतेतून करणायात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button