आपला जिल्हाताज्या घडामोडी

पाण्याच्या दबावाने खोरनिनको कालव्याचे अस्तरीकरण निखळले ; पाणी ओसरल्यावर तातडीने दुरुस्ती – पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विवेक सोनार

रत्नागिरी – मुचकुंदी (खोरनिनको) धरणावरील कालव्याचा अद्याप वापर सुरू केलेला नाही. डोंगरातून होणाऱ्या पाण्याचा पाझर अजूनही सुरू आहे. पाणी ओसरल्यावर अस्तरीकरणाची दुरुस्ती तातडीने पूर्ण करण्यात येणार आहे. एकंदरीत कालवा पूर्णपणे सुरक्षित असून, त्यामुळे कोणताही धोका उद्भवत नाही, अशी माहिती पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विवेक सोनार यांनी दिली.

मुचकुंदी (खोरनिनको) धरणावरील कालवा एकूण ४५४० मीटर लांबीचा असून, यापैकी साधारणतः दोन ते अडीच मीटर लांबीमध्ये कालव्याचे अस्तरीकरण निखळल्याचे निदर्शनास आले आहे.

या भागात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे डोंगरातून मोठ्या प्रमाणावर पाणी पाझरते. पाझरणाऱ्या पाण्याचा कालव्याखाली दबाव निर्माण होऊन त्या ठिकाणचे अस्तरीकरण निघाले आहे. डोंगरातून होणारा पाण्याचा पाझर अजूनही सुरू आहे. पाणी ओसरल्यावर अस्तरीकरणाची दुरुस्ती तातडीने पूर्ण करण्यात येणार आहे. कालव्याचा अद्याप वापर सुरू केलेला नाही. एकंदरीत कालवा पूर्णपणे सुरक्षित असून, त्यामुळे कोणताही धोका उद्भवत नाही.

Related Articles

Leave a Reply

Back to top button