ताज्या घडामोडी

राजिवली उपसरपंच सचिन पाटोळे यांचा भाजपला सोडचिठ्ठी देवून भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश .?

देवरुख - सुरेश सप्रे

संगमेश्वर तालुक्यातील राजिवली ग्रामपंचायतीचे भाजपाचे उपसरपंच सचिन पाटोळे यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र पक्षात प्रवेश केल्याचे फोटो आणि पोस्ट आल्या होत्या. खुद्द सचिन पाटोळे यांनी ७ जुलै रोजी भारत राष्ट्र समिती पक्षातील पदाधिका-यांसमवेत गळ्यात पक्षाचे चिन्ह असलेली पट्टी गळ्यात घालून फोटो काढून ते स्थानिक गृपवर व्हायरल केले होते. पण याबाबत अधिकृत माहीती समोर आलेली नसली तर पाटोळे व त्यांच्या सहका-यांनी कोणताही खुलासा केलेला नसलेने त्यांनी भाजपाला रामराम केला हे स्पष्ट होत आहे.

पाटोळे हे भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष सुर्यकांत साळुंखे यांचे समर्थक आहेत. ते डिसेंबर २०२२ रोजी झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत भाजप पुरस्कृत पॅनलमधून प्रभाग क्र. १ मधून सदस्य म्हणून निवडून आले होते त्यांना भाजप पुरस्कृत पॅनलमधून उपसरपंच पद दिले होते.

राजिवली ग्रामपंचायच सरपंच प्रशांत शिर्के आणि उपसरपंच सचिन पाटोळे यांना राजिवली ग्रामपंचायत १५ वा वित्त आयोगाच्या कामाचे बील मंजुर करण्यासाठी रत्नागिरी लाचलुचपत विभागाने ११ मे २०२३ रोजी प्रत्येकी १५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. सरपंच प्रशांत शिर्के आणि उपसरपंच सचिन पाटोळे यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यातच आता उपसरपंच सचिन पाटोळे यांनी भारत राष्ट्र समिती पक्षाची माळ गळ्यात घातल्याने भाजप पुरस्कृत पॅनलला धक्का बसला आहे.

राजिवली ग्रामपंचायत निवडणूकीत भाजप पुरस्कृत पॅनल चे सरपंच आणि सातपैकी तीन सदस्य निवडून आले होते मात्र राज्य सरकारच्या सरपंचाला एका मताच्या अतिरिक्त अधिकार निर्णयामुळे उपसरपंच पदाच्या निवडणूकीत सचिन पाटोळे यांना लॅाटरी लागली आणि सचिन पाटोळे उपसरपंच झाले मात्र पाचच महीन्यात सरपंच आणि उपसरपंच लाच घेताना पकडले गेल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर या लाच कारवाई वर सुर्यकांत साळुंखे यांनी पत्रकार परिषद घेत शंका उपस्थित केली होती. उपसरपंच सचिन पाटोळे हे भाजप पुरस्कृत पॅनलकडून उपसरपंच झाले आणि लाचेच्या गुन्ह्यांत अडकले आता त्यांना भारत राष्ट्र समिती पक्षाची साथ दिल्याने भाजप नेते काय भुमिका घेणार याकडे लक्ष लागून राहीले आहे.

त्यामुळे भाजप पुरस्कृत पॅनलचे सदस्य हि याबाबत काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून राहीले आहे..

Related Articles

Leave a Reply

Back to top button