आरवली ते बावनदी दरम्यान खड्ड्यांत गेला महामार्ग ; मुंबई – गोवा महामार्ग खड्डेमुक्त कधी होणार ?
संगमेश्वर - सचिन यादव

कोकणातील मंडळी कामानिमित्त मुंबईच्या कानाकोपऱ्यात आहेत. गणपती उत्सवानिमित्त ही सारी मंडळी कोकणात दाखल होतात मात्र संगमेश्वर तालुक्यातील खड्यांमुळे वाहन चालक त्रस्त झाले असून महामार्गावर रांगा लागत आहे.
गावाकडे येणाऱ्या प्रवाशांना मुंबई गोवा महामार्गावरील पडलेल्या खड्ड्यांतुनच प्रवास होणार आहे.
सध्या मुंबई गोवा महामार्गावरुन प्रवास करत असताना आपण आपल्या घरी वेळेवर जावू कि नाही अशी भावना महामार्गावरील प्रवासकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे.जीव मूठित धरुन चालक गाडी चालवत आहेत. रस्त्यामध्ये खड्डे असावेत परंतु खड्यात रस्ते नसावेत अशी स्थीती सध्या झाली आहे.
महामार्गावर दुचाकीस्वार कुटुंबासोबत दोन चार किलोमीटर प्रवास करताना त्याचे काय हाल होत असतील याची कल्पना करता येतं नाही.कदाचित तो प्रवास त्याच्या जीवावर सुध्दा बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सध्या प्रवाशांच्या तोंडून “कुठे नेऊन ठेवलाय महामार्ग आमचा” हेच ऐकायला मिळत आहे.
सत्ताधारी पक्षांवर अंकुश ठेवण्यासाठी विरोधीपक्ष असतों परंतु या गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ आहे कां नाही? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण होणार आहे चांगलं आहे आम्हाला आनंदच आहे परंतु महामार्गावर जागोजागी पडलेले भलेमोठे खड्डे तातडीने डांबरीकरण करुन बुजवावे एवढिच माफक अपेक्षा वाहन चालक व प्रवासी वर्ग करत आहेत
महामार्गावर एखादा अपघात झाला की त्याच्या कुटुंबीयांनी काही स्वरूपात आर्थिक मदत केली जाते.पण हे करण्यापेक्षा जर का महामार्ग व्यवस्थीत केला तर हि वेळ येणार नाही .
सर्व राजकीय पक्षांनी राजकारण बाजूला ठेवून एकदा आपल्या मुंबई गोवा महामार्गावर जागोजागी पडलेले खड्डे लवकर कसे भरतील याकडे लक्ष द्या अशी भावना व्यक्त होत आहे. संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते बावनदी या अपघातप्रवणक्षेत्रात जास्त खड्डे पडले आहेत.



