आपला जिल्हा

काटवलीत ६ ते ८ जानेवारी अखंड हरीनाम सप्ताह ; विविध कार्यक्रमांचे आयोजन.

संगमेश्वर – तालुक्यातील काटवली धनगरवाडी या ठिकाणी दरवर्षी तीन दिवसाच्या अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते पेण वढाव येथील इंचगिरी सांप्रदाय गुरुभक्त मंडळाचे संस्थापक प.पु सदगुरु लक्ष्मण महाराज यांच्या अधिपत्याखाली सन १९८३ साली या सप्ताह सोहळ्याला सुरवात झाली या वर्षी काटवली धनगरवाडी येथील सप्ताह कार्यक्रमाला ४१ वर्षे होत आहेत. सदगुरु लक्ष्मण महाराजांनी ग्रामीण भागात जावून धर्माची पताका फडकावत अध्यात्माचे विचार पटवून दिले. इंचगिरी संप्रदायाच्यावतीने जिल्ह्यात अनेक ठिकाणी अखंड हरीनाम सप्ताहांचे आयोजन केले जाते. मार्गदशनपर किर्तनांद्वारे परीवर्तन घडवले जाते. सदगुरु लक्ष्मण महाराज यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र सदगुरु तुळशीदास दादा महाराज यांच्याकडे संप्रदायाची धुरा असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध गावांमधून सप्ताह कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

काटवली धनगरवाडी येथील सप्ताह कार्यक्रमाच्या हरीपाठासाठी महाड, दाभोळे, येडगेवाडी, काटवली ( रत्नागिरी – पुणे ) मंडळींची साथ लाभणार असून ६ जानेवारी २०२४ रोजी गणराज भजन मंडळ, काटवली महेद्र बुवा नांदळजकर यांचे सुश्राव्य संगीत भजन होणार आहे.तर ७ जानेवारी २०२४ रोजी संत बाळुमामा यांच्या ओव्यांचा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाला भाविकांनी आपली उपस्थिती दर्शवावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

काटवली धनगरवाडीत सप्ताह कार्यक्रमानिनित्त ६ जानेवारी २०२४ रोजी प्रभाकर वाजे महाराज यांचे प्रवचन तर रात्री तुकाराम महाराज मुळीक ( आळंदी देवाची ) यांचे किर्तन असणार आहे. दि. ७ जानेवारी २०२४ रोजी गंगाराम महाराज शेळके यांचे प्रवचन तर रात्री गुरुवर्य तुळशीदास दादामहाराज यांचे किर्तन होणार आहे. दि. ८ जानेवारी २०२४ रोजी ९ ते ११ या वेळेत गुरुवर्य तुळशीदास दादा महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताह कार्यक्रमाची समाप्ती होणार आहे.

इंचगिरी संप्रदाय गुरुभक्त मंडळाच्या वतीने काटवली धनगरवाडी येथील सप्ताह कार्यक्रमाला आमदार शेखर निकम, काटवली सरपंच पूजा बाळकृष्ण उबारे, माजी सरपंच प्रभाकर गुरव, खरी लोकजागृती संपादक संतोष येडगे, जय मल्हार विकास सेवा संस्थेचे संगमेश्वर तालुका अध्यक्ष दत्ताराम शेळके, मॅक्स महाराष्ट्र चे पत्रकार कृष्णा कोळापटे, मोहन गोरे ( डोंबिवली ) , माजी पोलिस पाटील संदीप घवाळी, गोरखनाथ घाग, संतोष घाग, आर. एम गुरव, विजय लिलके आदी मान्यवरांना निमंत्रित केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button