Iदहिवली बुद्रुक येथे आ.भा. नोंदणी शिबीर

चिपळूण – शिवसेना उपनेते तथा माजी आमदार सदानंद चव्हाण व दहिवली बुद्रुक माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य रुपेश घाग यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आ. भा. नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले व ग्रामस्थांना मोफत कार्ड वाटप करण्यात आले. या शिबिराचा ३४५ ग्रामस्थानी लाभ घेतला.
या शिबिराचे उद्घाटन आ. सदानंद चव्हाण यांच्या हस्ते झालं. शाळेतील विद्यार्थ्यांना जातीचे व उत्पन्न दाखल्यांचे वाटप माजी आ. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना माजी आम. श्री.चव्हाण यांनी सांगितले की, रुपेश घाग यांच सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. त्याच्या प्रयत्नाने मोठ्या प्रमाणात विकासकामे गावात झाली आहेत. शासनाच्या विविध योजनांची परिपूर्ण माहिती रुपेशला आहे. त्यामुळे या योजनांचा लाभ ग्रामस्थांना झाला पाहिजे यासाठी त्यांची धडपड असते. आरोग्याची काळजी म्हणून त्यांनी स्वखर्चाने हे शिबिर आयोजित केले आहे, त्याचा लाभ ग्रामस्थानी घ्यावा.
यावेळी जिल्हा नियोजन सदस्य शशीकांत चाळके, दिलीप चव्हाण, प्रदीप चव्हाण, कु.राज चव्हाण, मांडकी खुर्द सरपंच श्री. धुमक, श्री. वायदंडे, सरपंच सौ.कल्पना घाग, ग्रामपंचायत सदस्य बाबाजी नवरंग, सौ. रसिका घाग, सौ.दक्षता घाग, सौ.रोहिणी शिवडे, ग्रामसेवक श्री.पाणींद्रे, विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चेअरमन विकास घाग, तंटामुक्ती अध्यक्ष महेश घाग डॉ.दवणे, डॉ.शेळके आदी उपस्थित होते.



