महाराष्ट्र

मुंबई विद्यापीठ आंतरराष्ट्रीय वसतीगृहासह इतर मागण्यांचे युवासेनेचे मुंबई विद्यापीठ कुलगुरुंना निवेदन

मुंबई प्रतिनिधी - जनार्दन येडगे

शिवसेना नेते,युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवासेना माजी व्यवस्थापन परीषद सदस्य,मुंबई विद्यापीठ प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.(डॉ.) रविंद्र कुळकर्णी यांना निवेदन मेल करुन विद्यापिठाच्या अभियंत्यांचा कार्यकाळ संपुन पुन्हा मूळ जागेवर परतल्यामुळे रिक्त झालेली जागा त्वरीत भरण्यात यावी याकरीता शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी केली आहे, गेल्या वर्षी तत्कालीन कुलपती,महमहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या शुभहस्ते उदघाटन झालेल्या कलीना कॅम्पस मधील आंतरराष्ट्रीय वसतिगृह आजतागायत विद्यार्थ्यांसाठी खुले झालेले नाही, त्याचवेळी उदघाटन झालेले मुलींचे वसतिगृह महापालिकेकडून पाण्याची जोडणी नसल्यामुळे ५० टक्के क्षमतेने सुरु करण्यात आले ते दिवंगत माजी महापौर प्रिं.विश्वनाथ महाडेश्वर यांच्या सहकार्याने युवासेनेने जोडणी जोडुन देऊन यंदा पुर्ण क्षमतेने सुरु होणार आहे त्याचप्रमाणें आंतर राष्ट्रीय वसतिगृह सुरु करण्यास कोणत्याही महापालिका अथवा शासन दरबारी परवानगी घेणे शिल्लक असेल तर युवासेना पुर्ण सहकार्य करून विद्यार्थ्याना आवश्यक सोयी सुविधा देण्यास तयार असेल परंतु याकरीता पुर्णवेळ अभियंत्यांची आवश्यकता आहे तरी त्यांच्या नियुक्ती करीता शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button