गणेशोत्सव काळात विद्यार्थ्याांच्या परीक्षा न घेण्याचे शिक्षणाधिका-यांचे आश्वासन ; युवासेनेच्या मागणीला यश
मुंबई प्रतिनिधी - जनार्दन येडगे

मुंबई – महाराष्ट्र राज्यात मंगळवार दि.१९ सप्टेंबर २०२३ ते गुरुवार दि.२८ सप्टेंबर २०२३ पर्यंत गणेशोत्सवसाजरा होणार असुन सदर कालावधीत शालेय विद्यार्थ्यांच्या कोणत्याही प्रकारच्या परीक्षा घेऊ नयेत अशी मागणी अनेक पालकांनी शिवसेना नेते,युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे केली असता त्याची दखल घेऊन युवासेना माजी व्यवस्थापन परीषद सदस्य,मुंबई विद्यापीठ प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी शिक्षणाधिकारी राजु तडवी यांना निवेदन देऊन केल मागणी केली . महाराष्ट्रात सर्व सण, उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे होत आहेत परंतु काही कॉन्व्हेन्ट शाळा जाणुन बुजून या कालावधीत शालेय विद्यार्थ्यांच्या लेखी,तोंडी अथवा प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याचा प्रयत्न करतात मुंबईतील कोकणवासीय सदर कालावधीत आपल्या कुटुंबासह मुळगावी जात असतात,शाळांना पाच दिवसांची सुट्टी दिली जाते परंतु परतीच्या प्रवासाला दळणवळण साधनांची कमी,अत्यंत वाईट रस्ते असल्यामुळे त्या कालावधीत परतणे शक्य होत नाही त्यामुळे उपरोक्त कालावधीत शालेय विद्यार्थ्यांच्या कोणत्याही प्रकारच्या परीक्षा घेऊ नयेत असे निवेदन दिले त्यावर कार्यवाहीच्या सूचना करत परीक्षा न घेण्याचे आदेश देण्याचे आश्वासन देण्यात आले असुन यामुळे शालेय विद्यार्थ्यांना गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करता येणार आहे.शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर आणि शिक्षण उपसंचालक मुंबई संदिप संगवे यांना ई मेल व्दारे पाठवून दूरध्वनीद्वारे संपर्क केला असता उप संचालक कार्यालयातून देखील कार्यवाहीचे आश्वासन देण्यात आले.



