आपला जिल्हा

कशेडी बोगद्यातील एका लेनची ट्रायल यशस्वी, हलक्या वाहनांची वाहतूक उद्यापासून सुरु होणार

खेड – मुंबई गोवा महामार्गाची एक लेन गणेशोत्सवापूर्वी सुरू होण्याची शक्यता कमी आहे. पण, महामार्गाच्या कामाबद्दल आनंदी आनंद असला तरीही या महामार्गावरील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या कशेडी बोगद्यातून घेण्यात आलेली ट्रायल रन केवळ आठ मिनिटात यशस्वी झाली आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने निश्चित केल्याप्रमाणे उद्या सोमवारी सकाळी ११ सप्टेंबरपासून या बोगद्यातून हलक्या प्रवासी वाहनांची वाहतूक सुरू केली जाणार आहे. अवघड वळणांचा कशेडी घाटाला पर्याय असलेल्या या बोगदातून वाहतुकीची गेल्या कित्येक महिन्यांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. मुंबई कडून गोव्याच्या दिशेने जाताना या बोगद्यातील एक लेन ११ सप्टेंबरपासून सुरू केली जाणार आहे. या बोगदाचे प्रवेशद्वार हे तिरंग्याने रंगवण्यात आल आहे. या बोगद्याच्या दोन्ही बाजूला रत्नागिरी आणि रायगड पोलीस प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्था ठेवली जाणार आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी आठवडाभरापूर्वी घेतलेल्या बैठकीत योग्य ते निर्देश महामार्ग प्रशासनाला दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button