विचारांची दिशा देत मला बाळासाहेब ठाकरे यांनी घडवले माजी मंत्री रविंद्र माने यांचे गौरवोद्गार ; रवींद्र माने यांच्या पासष्टीनिमित्त भव्य नागरी सत्कार
देवरुख - सुरेश सप्रे

ज्यांनी माझ्या जीवनाला व विचारांना दिशा देत समाजकारण करताना भविष्याचा वेध घेत जनतेच्या भावना समजून राजकारण करताना नवी पिढी कशी सक्षम होईल हे ज्यांनी शिकवले त्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सलाम करत माजी मंत्री रविंद्र माने यांनी बाळासाहेब प्रती क्रृतन्घता व्यक्त केली.
संगमेश्वर तालुका शिवसेना (उबाठा गट), सत्कार सोहळा समिती,रवींद्र माने मित्रमंडळ यांचे वतीने महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, संगमेश्वर लांजा तालुक्याच्या विकासाचे शिल्पकार – शिक्षण, कला व क्रीडा प्रेमी रवींद्र माने आपल्या वयाची पासष्टी पूर्ण केली. ते गेली ४२ वर्षे जनसेवा करीत असून समाजाप्रती असलेल्या योगदानाचे ऋण व्यक्त करण्यासाठी त्यांच्या नागरी सत्काराचे आयोजन मराठा भवन देवरूख येथे करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते.
या सोहळ्याच्या व्यासपिठावर खासदार विनायकजी राऊत चिपळूण-संगमेश्वर शेखर,निकम राजापूरचे आमदार राजन साळवी, गुहागरचे आम. भास्कर जाधव,राजापूरचे आम. राजन साळवी .माजी आमदार सुभाष बने.संजय कदम.सुर्यकांत दळवी. राष्ट्रवादी काँग्रेस सुरेश उर्फ बारक्याशेठ बने. शिवसेना (उबाठा गट) जिल्हाप्रमुख विलास चाळके राजेंद्र महाडीक शिवसेना सह संपर्क प्रमुख,माजी जि. प. अध्यक्ष रोहन बने बहुजन विकास आघाडीचे सुरेश भायजे. सौ. वेदा फडके. सौ. नेहा माने. सदानंद भागवत.मनोहर रेडीज आदी मान्यवर उपस्थित होते.
माझ्या जिवनात ज्यांनी मला घडविले त्या या कोकणच्या मातीला. आई. वडील. गुरूजनांसह माझ्या असंख्य मित्रांना माझा सलाम पण तरूणपणातच मला विचारांची दिशा देत मला घडवले व इथपर्यंत भरारी घेतली त्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना सलाम करत रविंंद्र माने यांनी क्रृण व्यक्त केले.
या सोहळ्यास जिल्ह्य़ातील सामान्यांची हजारोंची उपस्थिती पाहून माने यांनी जिल्हाच्या जडणघडणीत व विविध क्षेत्रात विशेषता शैक्षणिक क्षेत्रात दिलेले योगदान काय हे सांगण्याची गरज नाही..तसेच भविष्यातील गरजा ओळखून निर्धारपुर्वक केलेले काम आपण सर्व अनुभवले व त्याच कामामुळे आपण विविध पदापर्यंत पोहचलो आहोत हे विसरून चालणार नाही. अशा या विकास पुरूषाला शतायुषी लाभो असे प्रतिपादन खास. विनायक राऊत यांनी शुभेच्छा देताना केले.
यावेळी आम. भास्कर जाधव. राजन साळवी. माजी आम. सुभाष बने. सुर्यकांत आंदीनी हि आपले अनुभव खुमासदार शैलीत मांडत शुभेच्छा दिल्या.
यावेळी रविंद माने यांची तालुक्याचे तीने मान्यवरांच्या हस्ते भव्य नागरी सत्कार करण्यात आला.



