आपला जिल्हा

राजिवली ग्रामसभा संपन्न ! येडगेवाडी नळपानी योजना दोन्ही बाजूने करण्याबाबत एकमत ; अरुण कदम यांची तंटामुक्त समिती अध्यक्षपदी निवड.

संगमेश्वर – संगमेश्वर तालुक्यातील राजिवली ग्रामपंचायत ची १५ ॲागस्ट ची तहकूब ग्रामसभा २८ ॲागस्ट रोजी पार पडली या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली तर विविध समिती स्थापनेबाबत चर्चा झाली.

राजिवली ग्रामपंचायत ग्रामसभेत येडगेवाडी नळपानी योजना कामाबाबत चर्चा करण्यात आली या सभेत विविध मुद्यांवरील चर्चेअंती उद्योजक सुर्यकांत साळुंखे यांनी येडगेवाडी नळपानी योजना दोन्ही ठिकाणाहून करणेबाबत सूचना मांडली श्री.साळुंखे यांनी मांडलेल्या सूचनेला ग्रामसभेतील सर्वांनी सहमती दर्शवत नळपाणी योजना दोन्ही बाजूने करणेबाबत एकमताने ठराव करण्यात आला.

राजिवली ग्रामपंचायत तंटामुक्त समिती अध्यक्षपदी अरुण कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अरुण कदम यांची न्याय देण्याची पध्दत आणि गावातील शांतता राखण्यासाठी त्यांची राहीलेली भूमिका गावक-यांना आवडत असूम सलग १२ वर्षांपेक्षा अधिक काळ ते तंटामुक्त समिती अध्यक्षपदी राहीले आहेत. या वर्षीच्या ग्रामसभेत पुन्हा त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाल्याने ग्रामसभेतील सर्व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.

राजिवली ग्रामपंचायत ग्रामसभेला सरपंच दिपीका सावंत, तंटामुक्त समिती अध्यक्ष अरुण कदम, माजी सरपंच जयश्री कदम, माजी उपसरपंच संतोष येडगे, माजी उपसरपंच तुकाराम येडगे, ग्रामपंचायत सदस्य शैलेश घाडगे, रमेश येडगे, सौ. सोलकर, उद्योजक सुर्यकांत साळुंखे, आनंद रामचंद्र येडगे, माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन कदम, रामचंद्र येडगे, माजी ग्रामपंचायत सदस्या प्रगती शिर्के, कुटगिरी पोलिस पाटील शांताराम निकम, राजिवली पोलिस पाटील संदीप कदम, ग्रामसेवक सुनिल जाधव, आशा सेविका मानसी शिर्के, एकनाथ शिर्के, प्रकाश शिर्के, आत्माराम शिर्के, धोंडीबा येडगे, बारकू येडगे, राजेंद्र जाधव, विलास कदम, सिध्दार्थ कदम, राजाराम पाटोळे, शांताराम मोरे, तानाजी कुळ्ये, पांडूरंग येडगे ( कावळटेक ) ,दिपक सावंत, बबन, येडगे, देवू येडगे, लक्ष्मण येडगे, बाबू येडगे,रघूनाथ पाटोळे, दगडू पाटोळे, बेंडू पाटोळे आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button