संगमेश्वर गटविकास अधिकारी भरत चौगुलेंची तत्परता ; गायीचे प्राण वाचवण्यासाठी पुढाकार

संगमेश्वर – संगमेश्वर ( देवरुख ) पंचायत समिती गटविकास अधिकारी भरत चौगुले यांनी येडगेवाडीतील गायीचे प्राण वाचवण्यासाठी पुढाकार घेत पशुवैद्यकीय पथक तातडीने पाठवून गायीचा पत्र्याच्या डब्यात अडकलेला पाय बाहेर काढला आणि गायीचा प्राण वाचवला.
येडगेवाडीतील बारकू जानू येडगे यांच्या दुधाळ गायीचा पाय पत्र्याच्या डब्यात अडकल्याची माहीती गुरुवार दि.२७ रोजी सकाळी संगमेश्वर गटविकास अधिकारी भरत चौगुले यांना दिली होती. चौगुले यांनी या माहीतीची गंभीर दखल घेत पशूवैद्यकीय अधिकारी मानसी लोगडे यांना याप्रकरणी तातडीने पशुवैद्यकीय पथक येडगेवाडीत पाठवण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यांच्या सूचना लक्षात घेवून पशूवैद्यकीय कर्मचा-यांनी तातडीने येडगेवाडीत दाखल होवून गायीचा डब्यात अडकलेला पाय सुखरुप बाहेर काढला. गायीचे प्राण वाचवण्यासाठी तत्परतेने पुढाकार घेतल्याने पंचायत समिती गटविकास अधिकारी भरत चौगुले, पशूवैद्यकीय अधिकारी मानसी लोगडे आणि कर्मचा-यांचे संतोष येडगे यांनी आभार मानले.



