आपला जिल्हा

भाजपच्या रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्षपदी श्री. प्रशांत यादव संघटन मजबूत, नेतृत्व ठाम! : भाजपमध्ये उत्साह

चिपळूण – भाजपच्या रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष म्हणून श्री. प्रशांत यादव यांची प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यांनी नियुक्ती केली आहे. यामुळे भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

नगरपरिषद निवडणुकीच्या काळात भाजप दक्षिणचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे हे पद रिक्त होते. नगरपरिषद व पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप नेते प्रशांत यादव यांची कामगिरी अत्यन्त प्रभावी राहिली होती. चिपळूण तालुक्यात त्यांनी सर्व जुन्या – नव्या पदाधिकाऱ्यांना एकत्र विश्वासात घेऊन त्यांनी हे दैदीप्यमान यश मिळवून उत्तम संघटन कौशल्य दाखविले. त्यामुळे जिल्ह्यात भाजप अधिक मजबूत होण्यासाठी प्रशांत यादव यांची नियुक्ती केली आहे. रत्नागिरी दक्षिण भागात भाजप संघटना बळकट करण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

प्रशांत यादव यांनी यापूर्वी नगर परिषद तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये पक्ष संघटन मजबूत ठेवत प्रभावी नियोजन केले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण व परिसरात पक्षाला उल्लेखनीय यश मिळाले होते. बूथस्तरावरील संघटन, कार्यकर्त्यांशी सातत्याने संवाद आणि स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका यामुळे त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

पक्षाने त्यांच्या कार्यपद्धतीची दखल घेत ही जबाबदारी सोपविल्याचे सांगितले जात आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन विस्तार, नव्या कार्यकर्त्यांची जोडणी, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाची ताकद वाढविणे हे प्रमुख उद्दिष्ट त्यांच्या समोर असेल.

नियुक्ती जाहीर होताच चिपळूणसह रत्नागिरी दक्षिण भागात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशांत यादव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा देत आगामी काळात पक्ष अधिक सक्षमपणे उभा राहील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

दरम्यान, प्रशांत यादव यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत रत्नागिरी दक्षिण जिल्ह्यात संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आपण पूर्ण क्षमतेने काम करणार असल्याची प्रतिक्रिया यादव यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button