आपला जिल्हा
आरवली – येडगेवाडी मार्गावरील कुंभारखानी हायस्कूल येथील खड्डे तातडीने भरा अन्यथा आंदोलन – उपसरपंच समीर चव्हाण

संगमेश्वर – तालुक्यातील आरवली, मुरडव, कुंभारखानी, कुचांबे, राजिवली, रातांबी, येडगेवाडी प्रजिमा ४४ या मार्गावरील कुंभारखानी हायस्कूल या ठिकाणी खड्डे पडले असून विद्यार्थ्यांसह प्रवाशांना त्रास होत आहे. येथील खड्डे तातडीने भरावेत अशी विनंती कुचांबे उपसरपंच समीर चव्हाण यांनी केली आहे. २६ जानेवारी पर्यंत खड्डे न भरल्यास ग्रामस्थांसह तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उपसरपंच समीर चव्हाण यांनी दिला आहे.
आरवली – येडगेवाडी प्रजीमा ४४ या रस्त्याचे काम रत्नागिरीतील एका ठेकेदाराकडे आहे. त्यांच्या कामाची मुदत १५ जानेवारीपर्यंत आहे. कामाची मुदत संपण्यापुर्वी रस्त्याचे काम करावे अशी स्थानिकांची मागणी आहे मात्र स्थानिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने अखेर ग्रामस्थांसह आंदोलन करण्याचा इशारा उपसरपंच समीर चव्हाण यांनी दिला आहे.



