महाराष्ट्रातील तिस-या टप्प्यातील ११ लोकसभा मतदारसंघातून मतदान टक्केवारीत कोल्हापूर अव्वल ; मतदान टक्का वाढवण्यात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना यश

रत्नागिरी – लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचा महाराष्ट्रातील ११ लोकशभा मतदारसंघांचा समावेश असलेला मतदानाचा तिसरा टप्पा ७ मे रोजी पार पडला या तिस-या टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्याने मतदान टक्केवारीत अव्वल स्थान मिळवले आहे. कोल्हापूर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी मतदान जनजागृतीसाठी जिल्ह्याभरात विविध उपक्रम राबवत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या विविध उपक्रम आणि आवाहनाला कोल्हापूरकरांनी साथ देत तिस-या टप्प्याती मतदान टक्केवारीत कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ अव्वल आहेत.
कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव उपक्रमांच्या माध्यमातून सकारात्मक मोहीम राबवली होती त्याचा परीणाम लोकसभा निवडणूकीत दिसून आल्याने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह कोल्हापूर करांचे ही कौतुक होत आहे.
महाराष्ट्रात ७ मे रोजी ११ लोकसभा मतदारसंघांसाठी निवडणूक पार पडली यामध्ये टक्केवारीत लातूर ५५.३८ %, सांगली ५२.५६ %, बारामती ४७.८४ %, हातकणंगले ६२.१८ % , कोल्हापूर ६३.७१ % , माढा ५०% , धाराशिव ५५.९८ % , रायगड ५०.३१ % , रत्नागिरी – सिंधूदुर्ग ५३.७५ % , सातारा ५४.११ % , सोलापूर ४९.१७ अशी मतदान टक्केवारी आहे. ही मतदान टक्केवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ची होती त्यापुढील टक्केवारी उपलब्ध होवू शकलेली नाही.



