आपला जिल्हा

राहुल भैया दुबाले यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.

चिपळूण - ओंकार रेळेकर

चिपळूण – दरवर्षीप्रमाणे दिला जाणारा दादासाहेब फाळके आयकॉन अवार्ड फिल्म २०२३ यावर्षी महाराष्ट्र पोलीस बाइज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.राहुल भैया दुबाले यांना देण्यात आला. राज्यभर भय्यांच्या कामाचा आढावा घेत आणि भैय्यांनी कमी वेळेत पूर्ण राज्यभर आपल्या संघटनेचे जाळे पसरवत एक युवकांमध्ये प्रेरणा निर्माण केली. तसेच युवकांच्या स्किल प्रमाणे त्यांना योग्य क्षेत्रात योग्य मार्गदर्शन करून एक पाऊल पुढे टाकण्यासाठी मनोबल वाढवून साथ दिली.

नेहमी आपल्या संभाषण कौशल्यातून तसेच धाडसी निर्णयातून प्रत्येकाला हेवा वाटावा असे उपक्रम नेहमी राबवत भैयांनी प्रत्येक युवकांसाठी एक व्यासपीठ निर्माण केले. याच कामाचा आढावा घेत दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्ड फिल्म २०२३ हा पुरस्कार चे चेअरमन कल्याणजी जना यांच्या हस्ते मुंबई येथे पार पाडलेल्या कार्यक्रमांमध्ये देण्यात आला यावेळी मंचावर उपस्थित अनेक मान्यवर यांनी तोंड भरून कौतुक करून भैय्यांना शाबासकीची थाप दिली.यावेळी भैय्यांनी मी नेहमी युवकांसाठी अनेक व्यासपीठ निर्माण करेल याची भावना प्रत्येकाच्या हृदयात आणि डोळ्यात निर्माण केली. हेच काम वारंवार चालत आले चालत राहणार हीच भय्यांची शपथ भैया खरं करत असताना दिसत आहेत. संघटनेच्या माध्यमातून राज्यभर अनेक प्रश्नांना न्याय मिळवून दिला अनेक अन्याय यांना वाचा फोडली पोलीस पाल्यांचे प्रश्न, पोलिसांचे प्रश्न किंवा सामान्य जनतेचे प्रश्न भैय्यांनी स्वतःचे प्रश्न समजून मार्गी लावत गेले. या पुरस्काराने एक नवीन उमेद आणि एक नवीन प्रेरणा निर्माण झाली असून भय्यांना या उत्तुंग यशाबद्दल राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button