राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय युवा दिन साजरा

कोल्हापूर – राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्थेत स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊसाहेब जयंती तसेच राष्ट्रीय युवा दिन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याहस्ते स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊसाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले.
यावेळी, श्री.येडगे यांनी स्वामी विवेकानंदाचे व राजमाता जिजाऊसाहेबांचे विचारांची प्रेरणा सध्याचा अपेक्षित असलेला सुजान युवक याविषयी प्रशिक्षणार्थ्यांना संबोधित केले. तसेच, तंत्र प्रदर्शनचे गुणवंत प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यांत आले.
या कार्यक्रमाच्या सुरवातीला संस्थेचे प्राचार्य एम. एस. आवटे यांनी संस्थेविषयी ओळख करुन दिली. संस्थेत राबविण्यांत येणारे उपक्रम व व्यवसाय याविषयी माहिती दिली.
रामकृष्ण मठाचे मठाधिपती स्वामी बुध्दानंद यांनी स्वामी विवेकानंद यांचे विचार मांडले.
कमला कॉलेज मराठी विभाग प्रा. डॉ. सुजय पाटील यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊसाहेब यांच्या जीवनातील प्रसंग प्रशिक्षणार्थ्यांना कथन केले. यश मिळविण्यासाठी व अंतिम ध्येय गाठण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करावे असे सांगितले.
आजच्या युवकांना आदर्श वाटावा व प्रशिक्षणार्थ्यांनी स्वयंरोजगाराकडे वळावे यासाठी संस्थेतील माजी विदयार्थी दिनकर तुलवेकर, (व्यंकटेश इंजिनिअरिंग वर्क्स, गोकुळ शिरगांव, कोल्हापूर) विजय सुतार, (केदार इंजिनिअरिंग वर्क्स, हळदी, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांनी आपली यशोगाथा मांडली.
प्राचार्य एम. एस. आवटे, कमला कॉलेज मराठी विभाग प्रा. डॉ. सुजय पाटील, संस्था व्यवस्थापन समितीचे सदस्य राजू मगदूम, संजय पेंडसे, अनिरुध्द तगारे, हश्चिद्र धोतरे राष्ट्रीय स्वयंसेवक योजना कार्यक्रम अधिकारी सतिश माने व अभिजित पोवार व स्वयंसेवक तर गटनिदेशक, शिल्पनिदेशक, कार्यालयीन कर्मचारी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कार्यालय अधिक्षक एस. के. पारले यांनी केले.



