आपला जिल्हा

पाचांबे-नेरदवाडी येथे दोन गटात मारहाण, तीनजण जखमी, पोलिसात गुन्हा दाखल!

संगमेश्वर – तालुक्यातील पाचांबे-नेरदवाडी येथे दोन गटात झालेल्या मारहाणीत तिघेजण जखमी झाले असून दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष महादेव सावंत (वय ४८) हे शेजारी सुनिल जाधव यांच्या घरी गप्पा मारत बसले असताना आरोपी शाम शंकर घाडगे व रत्नकांत बबन घाडगे (दोघेही रा. पांचांबे-नेरदवाडी) हे दारूच्या नशेत तेथे आले. आरोपींनी शिवीगाळ करत लाकडी काठीने सावंत यांच्यावर हात, पाठ व छातीवर मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

मारहाण सुरू असताना सावंत यांची आई नलिनी सावंत व शेजारी ओम प्रदीप पवार (वय १५) हे सोडविण्यासाठी आले असता त्यांनाही आरोपींनी धक्काबुक्की व मारहाण केल्याचे सांगितले जाते. या घटनेत तिघेही किरकोळ जखमी झाले आहेत

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा क्रमांक १२/२०२६ दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. एस. एस. जाधव यांच्या करीत आहेत

Related Articles

Leave a Reply

Back to top button