उद्या २३ सप्टेंबर रोजी शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा

चिपळूण – शिवसेना उपनेते आणि चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सदानंदजी चव्हाण साहेब यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा उद्या, मंगळवार दि.२३ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते १२ वा. या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. संध्याकाळी मुंबई येथे शिवसेना राज्य कार्यकारणीची महत्वाची बैठक असल्यामुळे वेळेत बदल करण्यात आला आहे. याची सर्व पदाधिकारी अन शिवसैनिकांनी नोंद घ्यावी.
या निमित्ताने यावर्षी शहर आणि तालुका शिवसेनेच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. स्वामी मंगल हॉल, पुष्कर कॉम्प्लेक्स बहादूर शेख नाका, चिपळूण येथे मुख्य अभिष्टचिंतन सोहळा सकाळी १० वा. सुरु होणार आहे. यावेळी शिवसेनेचे मान्यवर नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. माजी आमदार सदानंदजी चव्हाण साहेब यांचा वाढदिवस शिवसैनिक दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करतात. तरी सर्व पदाधिकारी, अंगीकृत संघटना, महिला आघाडी समस्त शिवसैनिक यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन तालुका प्रमुख श्री.संदेश आयरे यांनी केले आहे.



