ताज्या घडामोडी

लोअर परेल कमला मील परीसरातील अनधिकृत बांधकामे निष्कासीत ; अतिरीक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्या निर्देशानुसार कारवाई

मुंबई – मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील लोअर परळ येथील कमला मील परिसरातील ‘लिव्हिंग लिक्विडस्’ या आस्थापनेतील अनधिकृत बांधकाम निष्कासित करुन त्यांच्या उपाहारगृहांचे दोन्ही परवाने रद्द करण्याची कठोर कारवाई अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी निर्देशांनुसार आज करण्यात आली.

‘लिव्हिंग लिक्विडस्’ यांनी अनधिकृतपणे तळमजला आणि पहिल्या मजल्यावर गारमेंट शॉपच्या ऐवजी रेस्टॉरंट बार व वाईन शॉप आणि तळमजल्यावर टेलरिंग शॉपऐवजी रेस्टॉरंट आणि डायनिंग असा बदल केला होता.

यापूर्वी, दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी कमला मील परिसरातील थेओब्रोमा, मॅकडोनाल्ड्स, शिवसागर हॉटेल, नॅनो’ज कॅफे, स्टारबक्स, बीरा टॅप्रूम, टोस्ट पास्ता बार (फूड बाय देविका) व बीकेटी हाऊस या ठिकाणी पाडकाम व जप्तीची कारवाई करण्यात आली होती.

दरम्यान, यापुढेही आणि इतरही ठिकाणी कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाकडून नमूद करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button