गावाच्या विकासासाठी कुचांबे येथील पदाधिका-यांनी घेतली आमदार शेखर निकम यांची भेट ; राष्ट्रवादी कॅांग्रेस चे जिल्हा सरचिटणीस तुकाराम येडगे यांचा पुढाकार

संगमेश्वर – तालुक्यातील कुचांबे या गावातील प्रमुख कार्यकर्त्यांनी आज दि.२८ अॅागस्ट रोजी चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांची सावर्डे येथील कार्यालयात भेट घेत गावातील विकास कामांबाबत चर्चा केली. यावेळी कुचांबे गावातील काही विकास कामे प्राधान्याने होणे गरजेची असून त्या कामांना तातडीने मंजुरी मिळावी अशी मागणी या भेटीदरम्यान आमदार शेखर निकम यांच्याकडे करण्यात आली आहे. आमदार शेखर निकम यांनी पदाधिका-यांना आश्वासन देत गावातील विकास कामांना तातडीने मंजुरी देण्यासाठी माझ्या स्तरावर सकारात्मक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या भेटीसाठी राष्ट्रवादी कॅांग्रेस चे नवनियुक्त जिल्हा सरचिटणीस तुकाराम येडगे यांनी पुढाकार घेतला.
आमदार शेखर निकम यांच्या भेटीच्या वेळी राष्ट्रवादी कॅांग्रेस जिल्हा सरचिटणीस तुकाराम येडगे, कुटरे येथील राष्ट्रवादीचे सुधीर राजेशिर्के आणि गावातील प्रमुख पदाधिका-यांमध्ये श्रीपत काजवे, अनिल थेराडे, समीर थेराडे, उदय थेराडे, अनिल सुर्वे, राजेंद्र सुर्वे,सखाराम काजवे, नितेश पवार ( आरवली ) आणि इतर गावकरी उपस्थित होते.



