आपला जिल्हा
काटवली येथील युवकांनी मनसेत केला जाहिर प्रवेश

देवरूख- संगमेश्वर तालुक्यातील काटवली येथील युवकांनी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जाहिर प्रवेश केला आहे.
मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्रजी चव्हाण, मनसे संगमेश्वर तालुका संपर्क अध्यक्ष श्रीपतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे तालुकाध्यक्ष व नगरसेवक अनुराग कोचिरकर यांच्या नेतृत्वाखाली आज रविवारी कोकण जागर यात्रेवेळी मनसे सरचिटणीस कामगार सेना अध्यक्ष मनोज चव्हाण, मनसे नेते दिलीप बापु धोत्रे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश करण्यात आला. संदेश फेफडे, सागर गुरव, प्रतिक गुरव, राहुल गुरव, आदित्य गुरव साहिल गुरव, मंदार गुरव , प्रथमेश गुरव, ओंकार घाग, भुषण धामणे या युवकांनी मनसेत प्रवेश केला. या सर्व पक्षप्रवेशकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांनी पक्षात स्वागत केले.



