आपला जिल्हा

तालुक्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीत गाणेतील पदाधिका-यांनी माजी सभापती धनश्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली घेतली आमदार भास्कर जाधव यांची भेट.

चिपळूण – तालुक्यातील राजकीय वातावर तापले आहे. अशा वेळी कोणती गावे कोणत्या पक्षाकडे आहेत याचा शोध सुरु असून राजकीय पक्ष प्रत्येक गावात आपआपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत त्यातच दि. २६ अॅागस्ट रोजी चिपळूणात शिवसेना ( शिंदे गट ) मेळावा पार पडला या मेळाव्यात विविध गावातील कार्यकर्ते सामील झाल्याचा दावा होत असताना आज दि. २७ अॅागस्ट रोजी गाणे ग्रामपंचायतमधील सरपंच अर्चना गजमल, उपसरपंच बाबाराम गजमल, बळीराम गजमल, दिनेश गजमल, दिपक गजमल, कृष्णा गजमल, बळीराम गजमल, दिपक गजमल आदी पदाधिका-यांनी चिपळूण पंचायत समितीच्या माजी सभापती धनश्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नेते तथा गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांची सदिच्छा भेट घेत चर्चा केली.

ओवळी पंचायत समिती गणाच्या सदस्या तथा चिपळूण पंचायत समिती माजी सभापती धनश्री शिंदे यांनी आपल्या कार्यकाळात ओवळी पंचायत समिती गणात पर्यायाने गाणे गावात विकासाची चांगली कामे केल्याचे यावेळी भेटीदरम्यान पदाधिका-यांनी शिवसेना नेते भास्कर जाधव यांना सांगितले तर त्यांची गाणे येथील जनतेची नाळ लक्षात घेता गाणे येथील सरपंच, उपसरपंच इतर पदाधिकारी आणि जनता त्यांच्या पाठीशी असल्याचा दावा यावेळी या पदाधिका-यांनी केला. गाणे या ठिकाणी झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत शिवसेनेने बाजी मारली होती माजी सभापती धनश्री शिंदे यांना मानणारा वर्ग या गावात आहे. धनश्री शिंदे यांच्या नेतृत्वात पदाधिका-यांनी आज शिवसेना नेते तथा गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती माजी सभापती धनश्री शिंदे यांनी शिवसेना नेतृत्वाची भेट घडवून आणत गावाच्या विकास आणि इतर विषयांवर सकारात्मक चर्चा केली. यावेळी आमदार भास्कर जाधव यांना पुष्पगुच्छ देत त्यांच्या सकारात्मक भेटीमुळे धन्यवाद दिले तर नेतृत्वाने आमच्या सोबत ताकदीने उभे रहावे असे मत व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button