“भायखळ्यानंतर परळही भगवामय! रेल कामगार सेना–मनसे युतीचा दमदार विजय;

मुंबई : रेल कामगार सेना–महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना युतीने मध्य रेल्वे मुंबई विभागातील इन्स्टिट्यूट निवडणुकांमध्ये सलग दुसरा दणदणीत विजय मिळवत प्रस्थापित गटांना ऐतिहासिक धक्का दिला आहे.
भायखळा इन्स्टिट्यूटमध्ये स्वतंत्र पॅनल विजयी झाल्यानंतर आता परळ इन्स्टिट्यूटमध्येही भगवा फडकवत, परिवर्तन पॅनलला प्रचंड बहुमत मिळाले. रेल कामगार सेना व मनसे रेल्वे कामगार सेना युतीने सीआरएमएस आणि ओबीसी, MRKS संघटनांना बरोबर घेऊन परिवर्तन करण्यासाठी निवडणूक लढवली. कामगारांनी या परिवर्तनाच्या भूमिकेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सर्व उमेदवारांना प्रचंड मोठ्या फरकाने विजयी केले.
राज्यात शिवसेना–मनसे युतीची चर्चा होत असताना, त्याचे प्रत्यक्ष प्रतिबिंब रेल्वे इन्स्टिट्यूट च्या या निवडणुकीत स्पष्टपणे दिसून आले असून युतीच्या शक्तीचे हे पहिले ठोस राजकीय–संघटनात्मक यश मानले जात आहे.
या पॅनलमध्ये –
सचिव : लहु थळे (मनसे)
खजिनदार : दिनेश महाले (RKS)
सदस्य :
1. भूषण भुरे(RKS)
2.प्रथमेश म्हात्रे (मनसे)
3. रितेश बडगुजर (RKS)
4. सतीश साळवी (CRMS)
5. अक्षय तांबे ( SC/ST)
6. राम सुभमल्ला(CRMS)
7. अशोक घाग ( CRMS)
अशी संपूर्ण कार्यकारिणी मोठ्या बहुमताने निवडून आली असून इन्स्टिट्यूटमध्ये इच्छित परिवर्तन साध्य झाले आहे.
हा विजय मिळवण्यासाठी मनसे रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील, मनसे कामगार सेनेचे मुंबई विभाग अध्यक्ष प्रवीण निंबाळकर , मुंबई विभाग सहसचिव काशिनाथ बल्लाळ मनसे परेल कारखाना अध्यक्ष रमेश आरकडे परळ कारखाना कार्याध्यक्ष फुलाजी भोईर, उपाध्यक्ष हरवंश सिमरिया, अक्षय जाधव, सनी चिपळूणकर विजय पांडे, सिद्धार्थ ओव्हाळ,महिला अध्यक्ष मोहिनी ताई तावडे, उपाध्यक्ष सरोजा चलन, संगीता जयस्वार, वेदश्री साळुंखे इत्यादी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. सत्य, शिस्त, संघभावना आणि सर्वांच्या संघटित मेहनतीचे फलित म्हणजे हा ऐतिहासिक विजय, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
रेल्वे कर्मचारी क्षेत्रातील या प्रचंड यशामुळे युतीचा जनाधार अधिक मजबूत झाला असून आगामी काळातही परिवर्तनाची लाट सुरूच राहील, असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला.



