आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण

संगमेश्वर तालुक्यातील पहिल्या पॅथॉलॉजी लॅबच्या नसरीन फैज पाटणकर यांची व्यवसायातून निवृत्ती

देवरुख - सुरेश सप्रे

संगमेश्वर तालुक्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या देवरुखमध्ये पहीली पॅथॉलॉजी लॅब सुरू करून सामान्यांना तपासणीची सोय उपलब्ध देणार्‍या नसरीन फैज पाटणकर यांनी या व्यवसायातून निवृत्ती स्विकारली आहे. देवरूख नंतर संगमेश्वर येथे हि मोडक पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी या नावाने लॅब सुरू केली होती.

तब्बल ३८ वर्षांच्या प्रदीर्घ रुग्णसेवेनंतर त्यांनी निवृत्ती जाहीर केली आणि अनेकांच्या या लॅब संबंधी जोडल्या गेलेल्या आठवणी जाग्या झाल्या आहेत.

संगमेश्वर तालुक्यात १९८६मध्ये पॅथॉलॉजिकल लॅब नव्हती. नसरीन पाटणकर यांनी पहिली लॅब सुरू केली. देवरुखमधील रुग्णांसाठी आठवड्यातून एक दिवस शुक्रवारी त्या देवरुख येथे सेवा देत असत. तसेच संगमेश्वर येथे लँब हि रोज सेवा सुरू केली होता. प्रदीर्घ सेवेनंतर आता त्यांनी या व्यवसायातून सेवानिवृत्ती घेतली आहे. गेली वीस वर्षे नसरीन फैज पाटणकर या संगमेश्वर पोलीस ठाण्यात महिला समितीमध्ये सदस्य म्हणून काम करीत आहेत. रत्नागिरी जिल्हा समता कमिटीच्या सदस्य, महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलच्या सदस्य.तसेच रत्नागिरी जिल्हा लॅबोरटरी असोसिएशनचे अध्यक्ष पद.आदी विविध पदावर काम केल.. व्यवसाय निवृत्तीनंतर श्री यांनी संगमेश्वर व देवरूखातून अनेकांनी सदिच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button