रत्नागिरी पोलीसांमार्फत ४० मूळ मालकांना हरवलेले मोबाईल परत.

रत्नागिरी – पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. धनंजय कुलकर्णी तसेच अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, जानेवारी 2023 ते जूलै 2023 अखेर सर्व पोलीस ठाणे हद्दीमधून नागरिकांचे गहाळ / हरविलेल्या मोबाईल ची माहिती सायबर पोलीस ठाणे व तांत्रिक विश्लेषण शाखा, रत्नागिरी यांच्या मार्फत एकत्रित करण्यात आली तसेच प्राप्त माहितीच्या आधारे जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांच्या अंमलदारांच्या मदतीने वेळोवेळी शोध घेऊन एकूण 57 मोबाईल चा शोध घेण्यात व ते पुनर्प्राप्त करण्यात रत्नागिरी पोलीसांना यश आले आहे.
दिनांक 22/08/2023 रोजी पोलीस अधीक्षक रत्नागिरी व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांच्या शुभ हस्ते पुनर्प्राप्त करण्यात आलेले एकूण 40 मोबाईल त्यांचे मुळ मालकांना परत करण्यात आले असून उर्वरित मूळ मालकांना त्यांचे मोबाईल, सायबर पोलीस ठाणे येथून ताब्यात घेण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.
प्रसंगी पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. धनंजय कुलकर्णी यांनी गहाळ मोबाईल परत मिळवून देण्यात मोलाची कामगिरी करणाऱ्या पोलीस अंमलदारांचे प्रशस्त पत्रक देऊन गौरव केला.
या कार्यक्रम सोहळ्यात पोलीस उपअधीक्षक मुख्यालय श्री. निलेश माईनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नागिरी श्री. विनीत चौधरी, पोलीस निरीक्षक श्री. जनार्दन परबकर, पोलीस निरी्क्षक श्री. शैलेश सणस, पोलीस निरीक्षक श्रीमती. शैलजा बोबडे, राखीव पोलीस निरीक्षक श्री. रमेश निकम, सहा. पोलीस निरीक्षक श्रीमती. वैशाली आडकूर व पोलीस अंमलदार असे उपस्थितीत होते.
या कार्यक्रमा दरम्याने पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी व अपर पेालीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांनी “सायबर गुन्ह्यांना बळी पडू नये या करिता मोबाईल वापरताना जनतेने घ्यावयाची दक्षता” याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
आपले गहाळ मोबाईल परत मिळवून दिल्याबद्दल उपस्थित 40 मोबाईल मालकांनी पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी तसेच रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचे आभार व्यक्त केले.
वरील नमूद मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण व शोध घेण्याकामी खालील नमूद पोलीस अधिकारी/अंमलदार यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.
1) पोलीस निरीक्षक श्रीमती. स्मिता सुतार, प्रभारी अधिकारी सायबर पोलीस ठाणे,
2) सहा. पोलीस निरीक्षक श्री. नितीन पुरळकर,
3) पोना/444 रमिज शेख,
4) पोशि/327 निलेश शेलार व
5) पोशि/988 अजिंक्य ढमढेरे.



