एक राखी देशासाठी एक राखी सैनिकांसाठी उपक्रम ; आकले गुरववाडी बौध्दवाडी प्राथमिक शाळेचा उपक्रम

चिपळूण – देश सेवेविषयी भावना शालेय वयातच वाढीस लागावी म्हणून भारतीय जवानांना रक्षाबंधनाच्या निमित्ताने राख्या पाठविणेचा उपक्रम जि.प. प्राथमिक शाळा आकले गुरववाडी,बौद्धवाडी आणि अंगणवाडी केंद्र गुरववाडी येथील शिक्षक, ग्रामस्थ विद्यार्थी यांच्या विचाराने व समाजसेवक दिनेश मोहिते यांच्या संकल्पनेतून पार पडला.
जि. प. प्राथमिक शाळा आकले गुरववाडी बौद्धवाडी येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या प्रती आदरभाव जपण्याचा होता. या विचाराने प्रेरित होऊन सर्वप्रथम कार्यक्रमाच्या निमित्ताने गावातील माजी सैनिक शांताराम कदम व संभाजी चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक आणि प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष कदम, सामाजिक कार्यकर्ते महेश शिंदे, स्वप्निल शिंदे यांनी मार्गदर्शन केले. माजी सैनिक संभाजी चव्हाण यांनी प्रत्यक्ष युद्धभूमीवरील थरारक अनुभव यावेळी कथन केले. यानंतर उपस्थित मान्यवर महिलांच्या हस्ते माजी सैनिक संभाजी चव्हाण आणि शांताराम कदम यांच्याकडे सीमेवर जवानांसाठी पाठविण्यासाठी राख्या सुपूर्द करण्यात आल्या. या कार्यक्रमाला विकास मोहिते, सचिन शिंदे, अर्चित मोहिते शालेय व्यवस्थापन उपाध्यक्ष सुगंधा जाधव, कमल कदम, प्रणाली कदम, श्वेता कदम, अंगणवाडी सेविका पवार मॅडम, जाधव मॅडम आणि दोन्ही वाडीतील महिला, सर्व विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक सचिन पवार यांनी केले.



