आपला जिल्हा
उबाठा शिवसेनेच्या नुतन तालुका प्रमुखांना शिवसेना शिंदे गटाकडून शुभेच्छा
देवरुख प्रतिनिधी

देवरूख – शिवसेना तालुका प्रमुख प्रमोद पवार यांनी आपल्या सहकार्यासह शिंन्दे गटात प्रवेश केला तेव्हा पासून गेले जवळपास १वर्ष रिक्त असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या संगमेश्वर तालुका प्रमुखपदी माजी सभापती बंड्या बोरूकर यांची निवड करणेत आली.. तसेच तालुका संघटक पदी जिपचे माजी उपाध्यक्ष संतोष थेराडे यांची नेमणूक करण्यात आली आहे
उबाठा शिवसेना तालुकाप्रमुख पदी विराजमान झालेल्या बंड्या बोरूकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत असताना शिवसेना शिंदे गटाचे तालुका संघटक प्रल्हाद (पपू)गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेश बने यांनी बोरूकर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.. त्यावेळीरोहन बने. इशत्याक कापडी. बाबा जाधव. आधी उपस्थितीत होते..



