आपला जिल्हा

२००० ते सन २००५ या कालावधीत नियुक्त करण्यात आलेल्या रोजंदारी कर्मचा-यांना सेवेत कायम करणेबाबत उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश.

मुंबई – उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्रामधील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या आस्थापनेवर सन २००० ते सन २००५ या कालावधीत रोजंदारी तत्वावर नियुक्त करण्यात आलेल्या वर्ग-३ व वर्ग-४ मधील कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याबाबत दि.४ नोव्हेंबर २०२५ रोजी बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयीन दालनात पार पडली,

राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या आस्थापनेवर रोजंदारी तत्वावर नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याबाबत यापूर्वी झालेल्या निर्णयाबाबत माहिती घेऊन त्या निर्णयानुसार आवश्यक ती कार्यवाही सन २००० ते सन २००५ या कालावधीत नियुक्त करण्यात आलेल्या रोजंदारी कर्मचारी यांच्या बाबतीत देखील करण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत दिले आहेत.

या बैठकीस गृहराज्यमंत्री योगेश कदम, नगरविकास विभागाचे अधिकारी, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती व्हा. राधा, नगरपरिषद आणि नगरपंचायत अधिकारी, दापोली नगराध्यक्षा सौ. कृपाताई घाग, नगरसेवक तसेच रोजंदारी कर्मचारी प्रतिनिधी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button