चिपळूण जलसंपदा विभाग पोहोच रस्त्याची राष्ट्रीय महामार्ग विभाग मुख्य अभियंता संतोष शेलार यांच्याकडून दखल.

चिपळूण – तालुक्यातील कापसाळ येथील पाचबंधारे प्रकल्प बांधकाम विभागाच्या कार्यालयाकडे जाणा-या पोहोच रस्त्याचे डांबरीकरण करण्याऐवजी फक्त खडी टाकून ठेवल्याने त्या रस्त्यावर घसरुन महीला आणि इतर कर्मचा-यांच्या आणि प्रकल्पग्रस्तांच्या दुचाकी घसरुन नागरीक जखमी होत आहेत या बाबत संबंधीत यंत्रणेकडून राष्ट्रीय महामार्ग विभाग कार्यकारी अभियंता कार्यालय आणि चिपळूण उप विभागीय अभियंता कार्यालयाकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर दखल घेतली जात नव्हती याबाबत खरी लोकजागृती मुख्य संपादक श्री. संतोष येडगे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता श्री. संतोष शेलार यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली असता मुख्य अभियंता श्री. संतोष शेलार यांनी या विषयी दखल घेवून पोहोच रस्ता आणि संरक्षण भिंतीचे अर्धवट राहीलेल्या कामाबाबत तातडीने कार्यवाही करण्यासाठी सूचना करत असल्याची माहीती दिली.

मुंबई – गोवा महामार्ग होण्यापुर्वी कापसाळ पाटबंधारे वसाहतीत महामार्गालगत पाटबंधारे विभागाच्या जमिनीत अनेक झाडे होती महामार्ग संपादनात शासकीय जमिन मोफत घेतली मात्र त्या जमिनीत असलेल्या झाडांचे मुल्यांकन करत त्या झाडांचा मोबदला पाटबंघारे विभागाला देणे व्यवहार्य असताना देखील त्या झाडांचा कोणताही मोबदला अद्याप दिलेला नाही तर महामार्गालगत असलेल्या पाटबंधारे कार्यालयासाठी आवश्यक असलेल्या ठिकाणी संरक्षण भींत बांधून देण्याची जबाबदारी महामार्ग विभागाची होती. मात्र त्या संरक्षण भिंतीचे काम ही अर्धवट सोडण्यात आले त्यामुळे अपघाताची शक्यता असून या ठिकाणी कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी व प्रकल्पग्रस्त यांच्या जीवीतास धोका निर्माण झाला आहे.
कापसाळ येथील जलसंपदा कार्यालय पोहोच रस्ता आणि सरंक्षण भिंतीबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता श्री. संतोष शेलार यांनी दखल घेतल्याने येथील धोका टाळण्यास मदत होईल असा विश्वास खरी लोकजागृती न्यूज चे मुख्य संपादक संतोष येडगे यांनी व्यक्त केला आहे तर मुख्य अभियंता श्री. संतोष शेलार हे संवेदनशील पणाने या विषयी अमंलबाजवणी करतील असा विश्वास असल्याचे श्री. येडगे यांनी यावेळी बोलताना सांगितले.



