राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीत पक्ष वाढीसंदर्भात चर्चा
तुतारी चिन्ह घरोघरी पोहोचविण्याचा निर्धार

चिपळूण – राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार या पक्षाच्या चिपळूण तालुका आणि शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक रविवारी सावरकर सभागृहात झाली. यावेळी पक्ष वाढीसंदर्भात चर्चा झाली.
या बैठकीला माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष रमेशभाई कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार या पक्षाचे नेते प्रशांत यादव, तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर, कार्याध्यक्ष शिरीष काटकर, अल्पसंख्याक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अब्बास जबले, शहराध्यक्ष रतन पवार, महिला तालुकाध्यक्ष राधा शिंदे, कार्याध्यक्ष अंजली कदम, महिला शहराध्यक्ष डॉ. रेहमत जबले व्यासपीठावर होते. तसेच आजी-माजी पदाधिकारी, विविध सेलचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी रमेशभाई कदम आणि प्रशांत यादव यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच पक्षाला मिळालेले तुतारी हे चिन्ह घरोघरी पोहोचवण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी केला.



