आपला जिल्हा

राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता संतोष शेलार यांचे आदेश प्राप्त होताच चिपळूण जलसंपदा पोहोच रस्त्याचे काम रात्रीत सुरु.

चिपळूण – कापसाळ ( चिपळूण ) येथील मुंबई – गोवा महामार्गालग असलेल्या जलसंपदा वसाहतीचा पोहोच रस्ता व्हावा म्हणून दिवसांपासून राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता, उप अभियंता यांच्याकडे विनंती करण्यात येत होती मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते पर्यायी या निसरड्या रस्त्यावरून प्रकल्पग्रस्त, जलसंपदा विभागाच्या महीला कर्मचारी दुचाकीवरून पडून जखमी होत होत्या याबाब राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता संतोष शेलार यांच्याकडे विषय मांडला असता त्यांनी तात्काळ दखल घेत धोकादायक काम तातडीने करण्याच्या सूचना केल्या आणि दि. ११ मार्च च्या रात्री ११ वाजता यंत्रणा जागी झाली आणि यंत्रसामुग्री तिथे पोहचवत कामाला सुरुवात केली. जीवीतास धोका असणा-या या रस्त्याविषयी तात्काळ दखल घेणा-या मुख्य अभियंता संतोष शेलार यांना संतोष येडगे धन्यवाद दिले.

जलसंपदा विभाग वसाहत ही मुंबई – गोवा महामार्गालगत असून त्या ठिकाणी महामार्गाचे काम करताना डोंगर खोदला आहे त्यामुळे कार्यालयाजवळ असलेली महावितरण ची उच्चदाबाची वाहीणी आणि ट्रान्सफर पडून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर प्रकल्पग्रस्त आणि जलसंपदा अधिकारी व कर्मचारी यांच्या जीवनातील धोका निर्माण झाला आहे. याबाबत तातडीने कार्यवाही करुन त्या ठिकाणी प्रस्तावीत असलेली संरक्षण भिंतीचे काम ही पुर्णत्वास जावे अशी मागणी आहे. याबाबत मुख्य अभियंता संतोष शेलार यांनी दखल घेतली असून मुख्य अभियंता संतोष शेलार यांच्या संपर्कात असून त्यांच्याकडे पाठपुरावा करुन ते ही काम मार्गी लागेल असा विश्वास संतोष येडगे यांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button