आपला जिल्हासामाजीक

छंद म्हणुन सुरु केलेल्या कलेतुन दोन दशकांची गणेश सेवा ; धामणी बडद वाडीतील संतोष बडद यांची यशोगाथा

संगमेश्वर - सचिन यादव

स्वसुखासाठी सुरु झालेला हा छंद शेवटी स्वतःबरोबरच इतरांच्या उपयोगास येतो, तेव्हा होणारा आनंद अवर्णनीय असतो. आपली आवड जोपासताना मिळालेलं छोटसं यशही समाधान देउन जातं आणि मग आणखी यश मिळवायची आवड तयार होते. काहीतरी गवसल्याचं सुख खुणावू लागतं . . .तसच काहिसे संगमेश्वर तालुक्यातील धामणी गावातील श्री संतोष बडद यांच्याबाबतीत झाले आहे. त्यांचा हा प्रवास!

अंगामध्ये असलेली उपजत कला जपण्यासाठी आणि मूर्ती काम करण्याचा छंद जोपासण्यासाठी धामणी बडदवाडी येथे सुरू केलेला गणेश मूर्ती कारखाना आजही त्याच डौलाने सुरू असून गेले वीस वर्ष गणेश मूर्ती कारखान्यातून मूर्ती घडवण्याचे काम संतोष देवजी बडद करीत आहेत.

शालेय जीवनामध्ये असताना संतोष बडद हे आवडीमुळे मातीपासून बाप्पाची मूर्ती करायला लागले आकार बरोबर येतं असल्याने आता आपण गणपती बाप्पा काढू शकतो हे लक्षात आल्यावर त्यांनी धामणी येथील जेष्ठ मूर्तीकार म्हणून ओळखले जाणारे कै.शिवाजी लिंगायत यांच्या मार्गदर्शनाखाली शिकले त्यानंतर स्वतंत्र कारखान्यामध्ये जाऊन मूर्ती काम करु लागले. त्यामुळे आपलाही कारखाना असावा असे त्यांना वाटे. त्या आवडीतून त्यानें वीस वर्षांपूर्वी धामणी बडदवाडी येथे गणपती कारखाना सुरू केला शाडू मातीतून गणपती आकार घेऊ लागले गणपती कारखान्यातून बनणाऱ्या मूर्ती आकर्षक बनू लागल्या तसेच रेखीव काम पाहून अनेक जण गणपती मूर्तींची मागणी करू लागले.

पारंपरिक शेती सांभाळत आणि रिक्षा व्यवसाय करत त्यांनी सेवाभावण्यातून सुरू केलेल्या गणपती कारखान्यातून अनेक गणेश मूर्ती घडत आहेत

जवळपासच्या गावातून गणेश मूर्तींची मागणी होत आहे त्यांच्या या गणेश मूर्तींच्या रंगकामामध्ये इयत्ता तिसरीत शिकणारा त्यांचा मुलगा रुद्र हा सहकार्य करतो तसेच त्यांचे कुटुंब ही मदत करते

संतोष बडद यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की मी शाळेत असताना मला चित्रकला हा विषय खूप आवडायचा त्यावेळी मी मातीचे गणपती साकारायचो जेव्हा माझ्या मनाला वाटले की आता आपण गणपती बाप्पा नक्कीच घडवू शकतो तेव्हा मी धामणी येथील जेष्ठ मूर्तीकार शिवाजी लिंगायत यांच्या मार्गदर्शनाखाली शिकायला मिळाले संपूर्ण माहिती घेतली आणि त्यानंतर शिवाजी लिंगायत यांचे आशीर्वाद घेतले आणि स्वतः कारखाना सुरू केला

मला माझ्या वाडीतील मंडळींनी खूप मोठी साथ दिली गेली वीस वर्षे पूर्ण वाडीतील गणपती माझ्या कारखान्यातून घेऊन जातं आहेत तसेच शेंबवणे येथे काही ठराविक गणेशमूर्ती जातात.

मला माझा मुलगा रुद्र तसेच कुटुंबियांनी चांगली साथ दिली आणि वाडीतील मंडळींनी त्यांच्यामुळे आपण विस वर्ष बाप्पाची सेवा करू शकलो असे संतोष बडद यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button