माखजन शिवसेना ( उबाठा ) गट व डेरवण हॉस्पिटल यांच्यामाध्यमातून महाआरोग्य शिबिराचे आयोजन

संगमेश्वर – तालुक्यातील माखजन शिवसेना विभाग ( उबाठा ) गट व डेरवण हॉस्पिटल यांच्या सहकार्यातून तसेच सामाजिक कार्यकर्ते संजय शिंदे व बाबू मोरे यांच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्र माखजन येथे गुरुवार दिनांक 9 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी हर्निया , अल्सर, अपेंडिक्स ,मुतखडा, टॉन्सिल्स, मूळव्याध, चरबीच्या अतिरिक्त गाठी, थायरॉईड, प्रोस्टेट ग्रंथी , पित्ताशयातील खडे ,इम्प्लांट रिमूव्हर ,नाक कान घसा, हायड्रोसेल , प्रोस्टेट ग्रंथी, फायब्रोडेनोमा, स्तनाचा कॅन्सर ,तोंडाचा कॅन्सर , मोतीबिंदू शस्त्रक्रिया ,नाकाचे हाड वाढणे, कानाच्या पडद्याची तपासणी, महिलांच्या गर्भाशय व गर्भाशय शस्त्रक्रिया , तसेच जनरल चेकअप, ईसीजी आदींची तपासणी केली जाणार आहे .या दरम्यान ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे त्यांना पिवळ्या व केशरी रेशन कार्ड च्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. यावेळी वालावलकर डेरवण हॉस्पिटलच्या संचालिका सुवर्णा पाटील मॅडम यांची प्रमुख उपस्थिती सह सर्जन, अस्थिरोग ,नेत्ररोग, स्त्रीरोग जनरल मेडिसिन आधी डॉक्टरांची टीम उपस्थित राहणार आहे.तरी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा अशी माहिती शिबिर आयोजकाकडून करण्यात आली आहे.



