आपला जिल्हा

कृषी, औद्योगिक संघाच्या संचालकपदी पूजा निकम बिनविरोध

रत्नागिरी – रत्नागिरी जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा संघाच्या संचालकपदी चिपळुणच्या सौ. पूजा शेखर निकम, रत्नागिरीच्या सौ. ऋतुजा उमेश कुलकर्णी यांची बिनविरोध निवड झाली आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, उपाध्यक्ष श्री. बाबाजी जाधव, संचालक ॲड. दीपक पटवर्धन यांनी संचालकपदी अर्ज भरावयाच्या व्यक्तींची नावे निश्चित केली. त्यामुळे राष्ट्रवादी, भाजपाला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. सौ. ऋतुजा कुलकर्णी या धामणसे ग्रामपंचायतीच्या सदस्या आहेत. यापूर्वी त्यांनी दोन वेळा संचालकपदाची निवडणूक लढवून विजयी होण्याचा मान मिळवला होता. धामणसे विविध कार्यकारी सोसायटीवर सौ. ऋतुजा कुलकर्णी या तज्ञ संचालिका म्हणून कार्यरत आहेत. भविष्यात शेती संदर्भात, शेतकरी, उद्योजक यांना उपयुक्त असलेले कामकाज करू असे प्रतिक्रिया सौ. ऋतुजा कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे. सौ. पूजा निकम या चिपळूण पंचायत समितीच्या माजी सभापती असून आमदार शेखर निकम यांच्या पत्नी आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण, ॲड. दीपक पटवर्धन आदींनी सौ. पूजा निकम, सौ. ऋतुजा कुलकर्णी यांचे अभिनंदन करून सहकार क्षेत्रातील पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button