संगमेश्वर तालुक्यातील कुटगिरी कदमवाडी, येडगेवाडी, राजिवली घाडगेवाडी येथील रस्ते, पाखाडी विकास कामे आमदार शेखर निकम यांच्याकडून मंजूर

संगमेश्वर – तालुक्यातील राजिवली ग्रामपंचाय कार्यक्षेत्रातील मुख्य रस्ता ते कुटगिरी कदमवाडी रस्ता डांबरीकरण, मुख्य रस्ता ते राजिवली घाडगेवाडी पुनर्वसन गावठाण, कुटगिरी येडगेवाडी पाखाडी आदी कामे व्हावीत म्हणून रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी सरचिटणीस तुकाराम येडगे यांनी आमदार शेखर निकम यांच्याकडे कामे मंजूर करण्याची मागणी केली होती तुकाराम येडगे यांच्या मागणीनुसार आमदार शेखर निकम यांनी राजिवली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील तीन गावातील या तीन वाड्यातील कामांना तब्बल १६ लाखांचा निधी उपलब्ध करुन देत कामांना मंजुरी दिली आहे.
आमदार शेखर निकम यांनी मंजुर केलेल्या कुटगिरी कदमवाडी, येडगेवाडी, राजिवली घाडगेवाडी येथील कामांचे आमदार शेखर निकम व राजिवली ग्रामपंचायत सदस्य शैलेश घाडगे, रमेश येडगे, तन्वी काळंबे आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत लवकरच भूमिपूजन करुन कामाला सुरुवात करणार असल्याची माहीती यावेळी तुकाराम येडगे यांनी दिली.
आमदार शेखर निकम यांची विकास दुरदृष्टी आणि पंचक्रोशीचा सर्वांगीण विकास डोळ्यांसमोर ठेवून तुकाराम येडगे यांनी आमदार शेखर निकम यांना साथ देत त्यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला असून गावांच्या विकासासाठी पहील्या टप्प्यात तब्बल १६ लाखांचा निधी उपलब्ध करुन देत आमदार शेखर निकम यांनी आपला शब्द पाळला आहे. राजिवली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील उर्वरीत वाड्यांच्या विकासासाठी आमदार शेखर निकम यांच्याकडे पाठपुरावा करुन गावांच्या विकासासाठी आणखी निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे आश्वासन आमदार शेखर निकम यांनी तुकाराम येडगे यांना दिले असून तशी माहीती यावेळी तुकाराम येडगे यांनी दिली.



