आपला जिल्हा
नवदुर्गा सन्मान अंतर्गत चिपळूण आगारातील महीला अधिकारी, कर्मचा-यांचा राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस दिशा दाभोळकर यांच्या हस्ते सन्मान

चिपळूण – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्षा रुपाली ताई चाकणकर यांच्या संकल्पनेतून तसेच चिपळूण विधानसभेचे आमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली आज चिपळूण बस स्थानकातील सर्व महिला अधिकारी,कर्मचारी,ते सफाई कर्मचारी या सर्व महिलांचा नवदुर्गा सन्मान अंतर्गत सन्मानपत्र व पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी महिला प्रदेश सरचिटणीस दिशा दाभोळकर, महिला तालुका अध्यक्ष जागृती शिंदे,शहर अध्यक्ष अदिती देशपांडे, माजी नगरसेविका शिवानी पवार,पूनम भोजने तसेच सर्व बस डेपो मधील अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते



