आपला जिल्हा

मेघीतील दोघांना शिकारीचा नाद नडला ; दोघे जण बंदुकीसह स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या ताब्यात

देवरुख – स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा पथकाने देवरुख पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी दरम्यान मौजे मेघी गावी येथे दोघांना मोटर सायकलसह ताब्यात घेऊन त्यांच ताब्यातून एक काढतुसची बंदूक एक जिवंत काडतुस व वन्य प्राणी शिकारी उपयुक्त साहित्य असे एकूण 1,17,450/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सदर गुन्ह्यात आरोपी 1) सुनील वसंत चव्हाण वय 22 वर्षे राहणार मेगी ता. संगमेश्वर 2) रोशन धनंजय आटले वय 20 वर्षे राहणार मेघी ता. संगमेश्वर यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई करिता देवरुख पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आले आहे

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे सपोनी श्री अमोल गोरे2)HC/1188 भागणे
3) HC/251 झोरे4) HC/301 पालकर5) HC/1238 खांबे6)HC/1410 दरेकर7)PC/215 कांबळे
यांनी ही कारवाई केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button