भाजपा संगमेश्वर महिला तालुकाध्यक्षपदी सौ. स्नेहा फाटक यांची नियुक्ती
देवरुख - सुरेश सप्रे

देवरुख – भारतीय जनता पार्टी संगमेश्वर (दक्षिण) तालुक्याच्या महिला मोर्चा तालुकाध्यक्ष म्हणून देवरुख शहरातील उद्योजक सौ. स्नेहा राहुल फाटक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
स्नेहा फाटक यांनी देवरुख शहराच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली होती. त्यांच्या कामगिरीचा आलेख आणि सामाजिक क्षेत्रात कार्य काम करण्याची तयारी पाहून भाजपा रत्नागिरी (द.) पदाधिकाऱ्यांनी ही निवड केल्याचे जाहीर करण्यात आले. सौ. स्नेहा फाटक एक लघुउद्योजिका म्हणून देवरुख परिसरात प्रसिद्ध आहेत. जिल्हाध्यक्षा सौ. सुजाता साळवी-चिटणीस तसेच जिल्हा सरचिटणीस सौ. संगीता जाधव आदी ज्येष्ठ सहयोगींच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात महिला मोर्चाचे काम तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
पक्षाने सोपवलेली जबाबदारी परिपूर्ण करण्यासाठी आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन संपूर्ण तालुक्यातील महिलांमध्ये भाजपाविषयी जिव्हाळा निर्माण करण्यासाठी माझे सर्वतोपरी प्रयत्न रहातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त करत नेत्यांनी माझ्यावार जो विश्वास दाखवला तो नक्कीच सार्थ ठरवेन असा विश्वास देत आगामी देवरूख न. पं. च्या निवडणुकीत पुन्हा एकहाती भाजपचा झेंडा फडकविण्यात मी स्वता मेहनत घेत पक्षाला निश्चित यश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. संगमेश्वर (द.) तालुकाध्यक्ष रूपेश कदम, चिपळूण विधानसभा निवडणूक प्रमुख प्रमोद अधटराव, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत शेट्ये, माजी नगरसेवक सदानंद भागवत, माजी नगराध्यक्ष निलेश भुरवणे, कुंदन कुलकर्णी यांचेसह महिला कार्यकर्ते यांनी सौ. स्नेहा फाटक यांचे अभिनंदन करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



