आपला जिल्हा

मिशन आपुलकी अंतर्गत कृष्णा अँटीऑक्सिडेंट कंपनीकडून वालोटी नं१ शाळेस स्मार्ट टी.व्ही.चे वाटप

चिपळूण – मिशन आपुलकी या जिल्हा परिषदेच्या उपक्रमाचे औचित्य साधून कृष्णा अँटी ऑक्सिडेंट प्रायव्हेट लिमिटेड गाणे- खडपोली या कंपनीकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वालोटी नं १ या शाळेला ३२ इंची दोन स्मार्ट टीव्हीचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत अनेक वर्षांपासून गोरगरीब, गुणी व होतकरू मुलांना शैक्षणिक साहित्याचे तसेच शाळांना त्यांच्या गरजेनुसार विविध शैक्षणिक साहित्याचे व वस्तूंचे वाटप या कंपनीच्या वतीने करण्यात येत असते.

शाळांच्या गरजा ओळखून त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे केला जातो. कंपनीच्या या अनमोल, उदार व दानशूर सामाजिक कार्याला मनापासून सलाम! कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा आराध्या कदम, वालोटी गावच्या सरपंच अवंतिका आंबेडे, उपसरपंच सचिन बामणे, मुख्याध्यापक संतोष कादवडकर, उपशिक्षक अजित कुरणे, सुनिल जाबरे, उपशिक्षिका प्रिया हळदणकर व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित कुरणे यांनी केले. सचिन बामणे यांच्या प्रयत्नामुळे अतिशय उपयुक्त अशी मदत शाळेतील मुलांना मिळाली याबद्दल सर्व मुलांनी व शिक्षकांनी समाधान व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button