आपला जिल्हा

चिपळूण नजीकच्या खेर्डीतील प्रशांत दाभोळकर आणि अंकुश जंगम यांनी ६०० कि.मी सायकल राईड वेळेपूर्वीच केली पूर्ण

चिपळूण- चिपळूण सायकलिंग क्लबचे सदस्य व खेर्डीचे रहिवासी प्रशांत दाभोळकर (वय ४५) आणि अंकुश जंगम (वय ३२) यांनी ६०० किमी लांब सायकल राईड (बीआरएम) वेळेच्या आत पूर्ण केली. ही स्पर्धा सह्याद्री रँडोनिअर्स या क्लबतर्फे पाटण-अक्कलकोट-पाटण या मार्गावर आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेपूर्वी प्रशांत दाभोळकर आणि अंकुश जंगम यांनी २००, ३०० आणि ४०० किमीच्या पूर्ण केल्या आहेत. या चारही सायकल राईड्स एका वर्षात पूर्ण केल्यामुळे त्यांना सुपर रॅन्डोनियर हा सायकलींग क्षेत्रात मानाचा समजला जाणारा किताब प्राप्त झाला आहे. ६०० किमीसाठी ४० तास वेळ निर्धारित केलेला असताना ऑक्टोबर महिन्यातल्या प्रचंड उन्हाच्या तडाख्यात सुद्धा या दोघांनी ही राईड केवळ ३४ तासात पूर्ण केली. प्रशांत दाभोळकर हे खेर्डीमध्ये बांधकाम व्यावसायिक असून ते कराटेमध्ये ब्लॅक बेल्टही आहेत. अनेक प्रकारच्या सामाजिक कामांमध्ये ते नेहमीच अग्रेसर असतात.

तसेच चिपळूणमध्ये आलेल्या २०२१ सालच्या महापुरामधील कामगिरीबद्दल त्यांना विशेष पुरस्कारही मिळालेले आहेत. अंकुश जंगम हेही खेर्डीमध्येच व्यावसायिक आहेत. त्यांनीही कराटे, तसेच रायफल शूटिंग या खेळांमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेले आहे. चिपळूण तालुक्यात सायकलिंग करीत असताना अनेक मुक्या जनावरांची सेवा केल्यामुळे त्यांना प्राणिमित्र असेही कौतुकाने म्हटले जाते. सायकलिंगमधील आपल्या या यशाचे श्रेय त्यांनी आपले कुटुंबीय, चिपळूण सायकलिंग क्लब, तसेच सह्याद्री रँडोनिअर्समधील सीनियर सायकलिस्ट यांना दिले आहे. यापुढे १०००, तसेच १२०० किलोमीटर लांबीच्या राईड्स पूर्ण करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला. चिपळूण सायकलिंग क्लब परिवारातर्फे परिवारातर्फे या दोन्ही रायडर्सचे जोरदार अभिनंदन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button